पूर्व विदर्भातील युवासेनेच्या युवतींच्या पदांकरिता मुलाखती

yuva-sena

पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिह्यातील युवासेना युवतीच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.

शनिवार, 26 जून 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नागपूर येथील रविभवन या शासकीय विश्रामगृहात कामठी, रामटेक, उमरेड, हिंगणा, काटोल आणि सावनेर विधानसभेसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तर 26 जून 2021 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रविभवन या शासकीय विश्रामगृहात नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर विधानसभेसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. रविवार, 27 जून 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभेसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. सोमवार, 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात गडचिरोली, आरमार व अहेरी विधानसभेसाठी (युवक आणि युवतींकरिता) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तर मंगळवारी 29 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात तिरोरा, गोंदिया, आमगाव व अर्जुनीमोरेगाव विधानसभेसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तर बुधवार, 30 जून सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात तुमसर, साकोली, भंडारा विधानसभेसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे, तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या