
वीज बिलावरील ग्राहकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया आता महावितरणने सोपी केली असून सात दिवसांच्या आत नावात बदल करण्यात येतो.
काही कारणांमुळे मालमत्तेची मालकी बदलल्यास नावात बदल करावा लागतो. त्यासाठी महावितरणने मोबाइल अॅप आणि वेबसाईटवर सुविधा उपलब्ध केली आहे.
अॅप किंवा www.mahadiscom.in या वेबसाईटवर लॉगिन करा. त्यात नमूद केलेल्या कारणाशी संबंधित आधार कार्ड, आधीचे वीज बिल, कराची पावती आदी कागदपत्रे अपलोड करा.
आवश्यक शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. महावितरणकडून सर्व कागदपत्रांची संबंधित उपविभाग कार्यालयातर्फे पडताळणी करण्यात येईल.
पडताळणी केल्यानंतर त्यात काही त्रुटी असल्यास ग्राहकांना त्याबाबत मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. आठवडाभराच्या आत नावात बदल होईल.
























































