
सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे आपले आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. आपण कामावर जायला उशीर होईल म्हणून न खाता घराबाहेर पडतो.आणि मग बाहेरचे तेलकट अन्न खातो. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे लसूण. लसूणचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
Weight Loss – वजन कमी करण्यासाठी भातासोबत ‘हा’ पदार्थ खा, रिझल्ट बघून चकीत व्हाल
लसूण म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. लसूण जेवणाची चव तर वाढवतोच याचसोबत आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणचे ३ तुकडे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे-
तुमचे हृदय निरोगी ठेवते-
लसूण रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते . तसेच हृदयविकाराचा झटक्या धोका कमी करते .
Health Tips – दुधात ‘ही’ पावडर घाला, फायदे जाणून थक्क व्हाल वाचा
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते-
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. यामुळे शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात . लसणाच्या नियमित सेवनाने सर्दी आणि खोकला सारख्या समस्या कमी होतात .
पचन क्रिया सुधारणे
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते . बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त यापासून आराम मिळतो.
मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त
लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते एक नैसर्गिक औषध म्हणून काम करते.
कोलेस्ट्रॉल कमी करते
लसूण “वाईट कोलेस्ट्रॉल” (LDL) कमी करते आणि “चांगले कोलेस्ट्रॉल ” (HDL) वाढवते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळता येतो.
Health Tips – अंगकाठी खूपच बारीक असेल तर, आहारात हे पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते
लसूण शरीराला विषमुक्त करण्याचे काम करते. ते रक्त शुद्ध करते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकते .
वजन कमी करण्यास उपयुक्त
लसूण खाल्ल्याने चयापचय होण्यास मदत होते. यामुळे चरबी जलद गतीने घट होते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
हाडे मजबूत होतात
लसणामध्ये सल्फर संयुगे आणि खनिजे असतात. ही खनिजे हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात . यामुळे संधिवात सारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो .
तुमची त्वचा आणि केस निरोगी राहतात
लसणातील अँटी -ऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. तसेच यामुळे केस गळती देखील थांबते.