शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक बेंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीम  पोलीस कॉलनी स्कूलच्या विद्यार्थ्यांना नुकतेच नवेकोरे बेंच भेट म्हणून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे बेंच चक्क पुठ्ठय़ाच्या कार्टनपासून तयार केले आहेत. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत नेस्ले ए प्लस, रिलायन्स  रिटेल आणि आरयूआर ग्रीन लाईफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

‘गो ग्रीन वुईथ टेट्रा पॅक’ प्रोग्रामचा विस्तार म्हणून ‘कार्टन्स टू क्लासरूम’ची सुरुवात मागच्या वर्षी करण्यात आली. कार्टन्सच्या पुनर्वापराबद्दल जागरूकता वाढवणे आणि दारिद्रय़रेषेखालील मुलांसाठी उत्तम दर्जाची शिक्षण संरचना पुरवणे हे त्यामागचे ध्येय आहे.

येत्या काही महिन्यांत इतर शाळांनासुद्धा असे बेंच देण्यात येतील. वापरलेले कार्टन्स गोळा करण्यासाठी रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर्स आणि सहकारी भांडार आऊटलेटमधील 54 कलेक्शन पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.