घोटाळे आणि अर्थ साक्षरता

640

>> यमाजी मालकर

स्वाभिमानी हिंदुस्थानी नागरिक आणि आर्थिकदृष्टय़ा समृद्धीचा अतिशय जवळचा संबंध आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधनसंपत्ती निर्मितीच्या प्रचंड क्षमता असलेल्या हिंदुस्थानातील अर्थकारण वेगाने बदलते आहे. ते सर्वांनी समजून घेणे म्हणजेच आर्थिकदृष्टय़ा साक्षर होणे. असे अर्थसाक्षर नागरिकच आर्थिक गैरव्यवहारांना पायबंद घालू शकतील आणि साधनसंपत्तीच्या न्याय्य वितरणाचा मार्ग प्रशस्त करतील.

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक घोटाळय़ांचा अतिशय जवळचा संबंध आहे. बहुतांश हिंदुस्थानी नागरिक आर्थिकदृष्टय़ा साक्षर नसल्यामुळे हिंदुस्थानात घोटाळे किंवा भ्रष्टाचार अधिक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आधुनिक जगामध्ये अर्थकारणाचे म्हणजे पैशांचे महत्त्व इतके काढले आहे की, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. त्यामुळे नवे अर्थकारण ज्यांनी समजून घेतले आणि त्यानुसार स्वतःत बदल केला ते हिंदुस्थानी नागरिक सध्या चांगले जीकनमान जगत आहेत, पण ज्यांनी हे समजून घेण्यास नकार दिला ते नागरिक केकळ आर्थिकदृष्टय़ा संकटात तर आहेतच, पण त्यांच्या जीवनमानाचा दर्जा खालावला आहे असे आपल्या लक्षात येईल. एकढेच नक्हे तर अर्थकारण समजून घेतले नाही तर हे जगच समजू शकत नाही, अशी एक स्थिती आजच्या जगात निर्माण झाली आहे.

याचा अर्थ, आधुनिक जगाच्या प्रवासाकडे अधिक बारकाईने पाहावे लागते. गेली दोन शतके जगाची लोकसंख्या सातत्याने वाढते आहे आणि आता ती साडेसात अब्जांच्या घरात पोचली आहे. त्यातील 1.35 अब्ज हिंदुस्थानी आहेत. हिंदुस्थानच्या लोकसंख्येची घनता (दर चौरस किलोमीटरला सरासरी नागरिक) 425 इतकी प्रचंड आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवाने निर्माण केलेली संपत्ती कोणाला अधिक मिळेल यासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. काही समूह ताटात पक्कान्न घेऊन त्याची नासाडी करताना दिसत आहेत, तर इतर समूह त्यांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहात आहेत. संपत्ती मिळकिण्यासाठीची चढाओढ त्यातूनच सुरू झाली असून, त्यातून घोटाळे आणि गैरव्यवहारांचा जन्म होतो. पण, ही संपत्ती जर सर्वांना समन्यायी पद्धतीने म्हणजे ‘रांगेचा फायदा सर्वांना’ या न्यायाने मिळाली तर त्याचे प्रमाण कमी होईल. पण, त्यासाठी आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे.

व्यवहार सर्वश्रेष्ठ मानला जातो असे म्हटले जाते आणि त्याचा अनुभव आपण घेतच असतो. व्यवहार नेहमीच मागणी आणि पुरवठय़ाचे गणित मांडत असतो, तर सर्वसामान्य माणूस आपल्या कष्टाचे मोल शोधत असतो. आधुनिक कागदी चलनाने अर्थकारणाची जी किचकट गणिते मांडली आहेत, ती शरीरकष्ट करणारी किंवा इतर सामान्य नागरिकांना कधीच सोडवता आलेली नाहीत. ती सोडवण्याचा प्रयत्न हा अपरिहार्य आहे. त्यालाच आपण आर्थिक किंवा अर्थसाक्षरता म्हणतो. ती आजच्या काळाची महत्त्वाची गरज झाली आहे. गेल्या दीड-दोन शतकांत नेमका बदल काय झाला आहे तो पहा. आपला देश शेतीप्रधान होता, म्हणजे सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून होते. कारण सर्व समाजच शेती करीत होता. 1857चा इंग्रजांविरुद्ध उठाव झाला तेव्हा तो मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारचा एवढा प्रचंड खर्च झाला की, त्याला तो झेपेना. मग हिंदुस्थान सोडून देण्यासंबंधीची चर्चा त्यावेळी संसदेत झाली. पण, जेम विल्सन नावाच्या अधिकाऱयाने 1860ला हिंदुस्थानात इन्कम टॅक्स सुरू केला हे आपल्याला माहीत आहे. पण त्याने आणखी एक महत्त्वाचा बदल केला, तो बदल म्हणजे शेतसारा कागदी रुपयांत चुकता करण्याची केलेली सक्ती. त्यामुळे हिंदुस्थानी समाज हा कागदी चलन वापरू लागला. तोपर्यंत जे चलन तो वापरत होता ते सोने, चांदी, तांबे अशा धातूंच्या स्वरूपातील होते, म्हणजे त्याला त्याचे म्हणून एक मूल्य (रियल व्हॅल्यू) होते; पण कागदी नोटांमुळे सरकारचा अधिकार म्हणूनच त्याचे मूल्य मान्य करण्याची समाजावर सक्ती झाली. त्याचा परिणाम म्हणजे शेतीचा गावागावांत जो विनिमय (केकळ देकघेक) होत होता, त्याचा आता क्यापार होऊ लागला. थोडक्यात, वस्तूच्या बदल्यात वस्तू ही बार्टर पद्धत हळूहळू बंद होऊ लागली आणि हिंदुस्थानी समाज नाइलाजाने प्रथमच कागदी नोटा वापरू लागला. तो ते गेली किमान 165 वर्षे वापरतो आहे. पण, कागदी चलनाचे हे अर्थशास्त्र त्याला खऱ्या अर्थाने कळले असे आजही म्हणता येणार नाही. आपण कष्ट करतो किंवा ज्या वस्तूंची निर्मिती करतो त्याचे मूल्य कागदी चलनात ठरवणारी आधुनिक व्यवस्था आपल्या आवाक्यात नाही. त्यामुळे आपण जेवढे देतो आणि जेवढे घेतो यात मोठी तफावत पडते आहे. आणि त्यातून आपण आर्थिकदृष्टय़ा सतत मागे ढकलले जातो आहोत हे बहुजनांच्या अजूनही लक्षात येत नाही. ती व्यवस्था समजून घेणे म्हणजेच आर्थिकदृष्टय़ा साक्षर होणे होय.

थोडक्यात, चलनाची व्यवस्था मान्य करण्यावाचून आज पर्याय नाही. त्यामुळे त्या चलनाच्या माध्यमातून जी अर्थरचना तयार झाली आहे ती समजून घेणे आणि त्यातील आपला न्याय्य वाटा मिळवणे, इतरांनाही तो मिळेल याचा आग्रह धरणे; तसेच कोणी त्याचा घोटाळ्याच्या किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने गैरफायदा घेत असेल तर त्याला प्रतिबंध करणे होय. आर्थिक व्यवस्था जेव्हा काही मोजक्या लोकांच्या हातात असते तेक्हा ते तिला वाटेल त्या पद्धतीने वाकवतात आणि त्यातून आपले ईप्सित साध्य करून घेतात. पण, हीच व्यवस्था सर्वांना कळत असेल आणि पारदर्शी असेल तर ती मनमानी पद्धतीने काककिता येत नाही. आर्थिक व्यवहार पारदर्शी करण्याचा सोपा मार्ग आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त बँकिंग करणे. ज्याद्वारे चलन तर फिरत राहतेच, पण त्याचे व्यवहार पारदर्शी होतात. मग आपल्या लक्षात येते की, सध्या जे आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत त्याचे कारण त्या व्यवहारात कोठे ना कोठे बँकिंगचे व्यवहार झाले असून, त्याच्या खुणा (पुरावा) पुसता येत नाहीत. पण, हेच व्यवहार जर रोखीने झाले तर त्याच्या कोणत्याही पाऊलखुणा राहत नाहीत आणि ते घोटाळे उघडकीसही येत नाहीत. आपल्या देशात काढत चाललेले बँकिंग आणि त्यासाठी झालेल्या नोटबंदीचे महत्त्व अशावेळी लक्षात येते.

नैसर्गिक संसाधनांचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि पैशांचे शास्त्र म्हणजे वित्तशास्त्र. आज साऱ्या जगाला व्यापले आहे ते वित्तशास्त्राने. अनेकांना वित्तशास्त्र हेच अर्थशास्त्र वाटते आणि त्यातच आपली फसगत होते. वित्तशास्त्राने असे काही टूल तयार केले आहेत की, ज्याच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान आहे तो घरबसल्या पैसा मिळवू शकतो. एकढेच नक्हे, तर शारीरिक, बौद्धिक कष्ट करणाऱ्यांपेक्षा तो अधिक पैसा कमावतो. तो तेथेच थांबत नाही, तो अशा कष्ट करणाऱया नागरिकांचे शोषणही करू शकतो. शेअर बाजारातील ट्रेडिंग आणि कॉलमनीचे व्यवहार ही अशी टूल आहेत. अर्थात कागदी चलन आणि जागतिकीकरणाची ही देण आहे. ही दिशा अशी आहे, जी आपण टाळू शकत नाही. त्यामुळे ती समजून घेणे आणि त्यातील दुसरे टोक गाठण्याऐवजी त्याचा सुवर्णमध्य गाठणे, यातच शहाणपण आहे. ते शहाणपण म्हणजे आर्थिक साक्षरता.

हा सुवर्णमध्य म्हणजे काय ते पहा. आधुनिक जगात डिजिटल व्यवहारांना अतिशय महत्त्व आले आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करणे क्रमप्राप्त आहे. त्यापुढील पायरी म्हणजे जमिनी, सोने, घरे यात गुंतवणूक न करता पैसा जेथे फिरता राहतो अशा पद्धतीने तो गुंतवणे. ती गुंतवणूक म्हणजे बँका, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, निवृत्ती योजना, विमा अशा मार्गाने तो फिरत ठेवणे, जेणेकरून व्याजदर तर कमी झालेच पाहिजे, पण पैसा सर्वांना वापरायला मिळाला पाहिजे. पैशांचा वापराचा हा जो बदल आहे, तो विकसित देशांनी केला आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे आता क्रमप्राप्त झाले आहे. आपल्या समाजातीलही अनेकांनी हा बदल स्वीकारला असून, त्यामुळेच बँकांतील व्यवहार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. म्युच्युअल फंड आणि थेट अशी शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली आहे. आरोग्य आणि जीवन विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नव्हे तर, पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रथमच एवढी वाढली आहे. थोडक्यात, पूर्वी पैसा जमिनीत, सोन्यात आणि केवळ गुंतवणूक म्हणून घेतल्या जाणाऱ्या घरांत अडकून पडला होता आणि आता तो नव्या पद्धतीच्या गुंतकणुकीत जाऊ लागला आहे. अर्थात, त्याचा केग आपल्या देशात अजूनही खूप कमी आहे. मला पुरेसा पैसा का मिळत नाही, असा प्रश्न ज्यांना पडला आहे त्यांना हा बदल आता समजून घ्याका लागणार आहे. पैसा संघटित क्षेत्राकडे केगाने जातो आहे. अशा ज्या क्षेत्रात तो जातो आहे त्यात आपली गुंतवणूक असली पाहिजे. याचा अर्थ त्यांनी लगेच शेअर बाजारात गुंतवणूक करावी असा होत नाही; पण भविष्यात या बदलाची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांना दखल घ्यावी लागणार आहे.

(लेखक अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त, ‘अर्थपूर्ण’ मासिकाचे संपादक आणि आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या