
हिंदुस्थानात कोरोनामुळे 42 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज न्युयॉर्क टाईम्सने व्यक्त केला होता. आता इकॉनॉमिस्ट या मासिकानेही देशात सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा सात पट मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण केंद्र सरकारने इकॉनॉमिस्टचा हा दावा फेटाळला असून कोरोना मृतांचा आकडा लपवला नसल्याचे म्हटले आहे.
इकॉनॉमिस्टनने देशाच्या सहा राज्यांतील कोरोना आकडेवारीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार 2021 या वर्षातील पहिल्या 19 आठवड्यांत प्रति एक लाख रुग्णांमागे 131 ते 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार संपूर्ण देशाची आकडेवारी पाहता 1* आठवड्यांत 17 ते 24 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे इकॉनॉमिस्टने म्हटले आहे.
केंद्र सरकराने इकॉनॉमिस्टचा हा आरोप फेटाळून लावला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी इकॉनॉमिस्टचे नाव न घेता त्यातील माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. तसेच हा लेख काल्पनिक आणि भ्रम पसरवणारा असून त्या आकडेवारीला काहीच आधार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.





























































