मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जप्त केले तीन चिंपाजी

556

पश्चिम बंगालमध्ये मनी लॉन्ड्रिंगचं वेगळेच प्रकरण उघडकीस आले आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने तीन चिंपाजी आणि चार अमेरिकी माकडांना ताब्यात घेतले आहे. यातील प्रत्येक चिंपाजीची किंमत 25 लाख असून अमेरिकी माकडांची किंमत दीड लाख रुपये आहे. पश्चिम बंगालच्या वन्यजीव विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. वन्य प्राणी बाळगल्याचा आरोप ठेवत कोलकातातील सुप्रदीप गुहावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीवांची तस्करी केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे वन्यजीवांची तस्करी करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

जप्त करण्यात आलेल्या या तीन चिंपाजी आणि चार अमेरिकन माकडांना सध्या कोलकाताच्या अलीपूर जिओलॉजिकल गार्डनमध्ये ठेवण्यात आले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुप्रदीपला अटक करण्यात आल्यानंतर त्याने वन्यजीवांची बेकायदा तस्करी केल्याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या