
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी रात्री उशिरा जेट एअरकेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. एका ट्रव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. संबंधित कंपनीने गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त परकीय चलनविनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाबही नोंदवला आहे. यापूर्की गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. परकीय चलनविनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. 2014 मध्ये करण्यात आलेल्या या गुंतवणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले होते.



























































