अंडी की पनीर? वजन कमी करण्यासाठी जास्त प्रथिनं कशातून मिळतात, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या वजनावर नियंत्रण आणणे आणि स्नायूंच्या बळकटीकरणासाठी शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते. यासाठी आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. वेगवेगळ्या अन्नपदार्थांत प्रथिनांचे प्रमाण वेगवेगळे आणि पोषणाच्या दृष्टीने प्रत्येक पदार्थांतली गुणवत्ताही वेगवेगळी असते. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करताना अंडी की पनीर ? या दोन्ही पदार्थांचा विचार प्रथम केला जातो. कारण वजन कमी करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी हे दोन्ही पदार्थ अत्यंत सोपे असून पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत. यामध्ये शाकाहारींसाठी पनीर हा प्रथिनेवाढीचा एकमेव स्त्रोत आहे, तर मांसाहारींसाठी अंड आणि पनीर या दोन्ही पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकतात. असे असले तरीही वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, पाहूया.

अंड्यात किती ग्रॅम प्रथिनं असतात?

दिवसभरात शरीराला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये असतात. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतात. ऑमलेट, उकडलेलं अंड, अंडी करी अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलेल्या अंड्यांचा आहारात समावेश करू शकता. बरेच जण अंड्यातील पिवळा बलक जास्त चरबीयुक्त असल्यामुळे खात नाहीत, मात्र पिवळ्या बलकामध्ये पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात. शिवाय अंडी ही इतर अन्नपदार्थांच्या तुलनेने स्वस्त असतात.

अंड्यातील पोषक तत्त्वे 

प्रथिने – 5.5 ग्रॅम
फॅट – 40.2 ग्रॅम
कॅल्शियम – 24.6 ग्रॅम
आयर्न – 0.8 मिग्रॅ
मॅग्नेशियम – 5.3 ग्रॅम
फॉस्फरस – 86.7 ग्रॅम
पोटॅशियम – 60.3 मिग्रॅ
झिंक- 0.6 ग्रॅम
कोलेस्ट्रॉल – 162 मिग्रॅ
सेलेनियम – 13.4 मायक्रोग्रॅम

40 ग्रॅम पनीरमधील पोषक तत्त्वे

प्रथिने – 7.54 ग्रॅम
फॅट – 5.88 ग्रॅम
कार्बन – 4.96 ग्रॅम
फोलेट – 37.32 मायक्रो ग्रॅम
कॅल्शियम – 190.4 ग्रॅम
फॉस्फरस – 132 ग्रॅम
पोटॅशियम – 50 मिग्रॅ

पनीरमधील प्रथिने आणि फॅटचं प्रमाण

पनीर हा हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय दुग्धजन्य पदार्थ आहे. बहुतांश लोकांना पनीर अतिशय आवडते. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सँडविच, सलाड, भाजी असे वेगवेगळ्या पद्धतीने पनीरचा आहारात समावेश केला जातो. पनीर व्हिटॅमिन बी-12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि रिबोफ्लेविन या पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. 40 ग्रॅम पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रोटीन आणि सुमारे 5 ग्रॅम फॅट असतात. , जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे असतात.

अंडी की पनीर ?

वाढत्या वजनावर नियंत्रण आणणे आणि लठ्ठपणा कमी करणे यासारख्या त्रासांवर हे दोन्ही पर्याय उपयुक्त आहेत. कारण अंडी आणि पनीर या दोन्हींमध्ये समान पोषक तत्त्वे असून दोन्ही पदार्थ जीवनसत्त्व डी आणि बी-12ने समृद्ध आहेत. त्यामुळे दोन्हींचा आहारात समावेश करणे हा चांगला पर्याय आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि जे अंडी खात नाहीत त्यांच्याकरिता पनीर खाणे फायदेशीर आहे. असे लोक आहारात पनीर खाण्याचे प्रमाण वाढवू शकतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी कॉटेज चीज खाणे अंडी खाण्याइतकेच फायदेशीर ठरू शकते. त्यांना त्यांच्या प्रथिने आणि पोषक आहाराबद्दल काळजी करण्याची गरज नाही. याशिवाय वजन नियंत्रणासाठी आहारात सोया उत्पादने, कडधान्ये, सुकामेवा यांचाही समावेश करावा. यामुळे जास्तीत जास्त प्रथिने आणि अनेक पोषक घटक शरीराला मिळू शकतील.