खडसे महिनाभरात भाजप सोडणार, ऑडिओ क्लिप व्हायरल

पक्षांतर्गत राजकारणामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत पक्षांतराची चर्चा फेटाळून लावणाऱया खडसे यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यामध्ये एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना त्यांनी आपण केवळ पदाच्या प्रतीक्षेत असून महिनाभरात भाजप सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

किधानसभा निकडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत त्यांना स्थान दिले गेले नाही. त्यापाठोपाठ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही डाकलण्यात आले. यामुळे भाजपमध्ये एकनाथ खडसे प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील कमालीची नाराजी आहे. पक्ष सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत आहे. वरणगाव येथील रोशन भंगाळे नावाच्या कार्यकर्त्याशी यासंदर्भात फोनवरून संवाद साधताना खडसे यांनी भाजप सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, या संवादाविषयी खडसे यांनी सांगितले की, कार्यकर्ते अशा प्रकारची विचारणा करीतच असतात. तो कॉल चुकीचा असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

आपली प्रतिक्रिया द्या