कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती हा शेतकऱ्यांचा विजय – एकनाथ शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे कृषी कायद्यांना स्थगिती देण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एका 4 सदस्यांच्या समितीचे गठन केले आहे.

या निर्णयावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने तीन कृषी कायद्यासंदर्भात दिलेला स्थगनादेश, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपुरात दिली आहे.

एका कार्यक्रमासाठी ते आज वरोरा इथं आले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारने दुर्लक्षित केल्याचा हा परिणाम असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या आंदोलनात दखल घ्यावी लागणे हे महत्त्वाचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.