
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटवर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या एक्स अकाऊंटव पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे झळकल्याने खळबळ उडाली. हॅकरने पाकिस्तान आणि तुर्कीशी संबंधित व्हिडीओ, तसेच लाईव्ह स्ट्रिमिंगही केले.
शिंदे यांचे एक्स अकाऊंट हॅक झाल्यानंतर सायबर क्राइम पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आयटी तज्ज्ञांनी 30 ते 45 मिनिटानंतर हे अकाऊंट पूर्ववत करून दिले. मात्र या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप