
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इस्राएलमध्ये मध्यावधी निवडणुकांचे बिगुल वाजले असून 17 सप्टेंबर रोजी मतदान आहे. इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रचारासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. निवडणुकीदरम्यान नेतन्याहू यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आहेत. गेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले. म्हणून इस्राएलमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्यात येत आहे.
נתניהו. ליגה אחרת. pic.twitter.com/07YGtjfXwL
— Benjamin Netanyahu (@netanyahu) July 28, 2019
नेत्यनाहू यांनी प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ट ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्श व्लादिमीर पुतिन आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असलेले मोठे होर्डिंग प्रचारासाठी वापरले आहेत.
जगातले नेते आपल्यासोबत आहेत असा संदेश त्यांनी या होर्डिंगवरून दिला आहे. 9 एप्रिल रोजी इस्राईलच्या निवडणुकीचा निकाल लागला होता. नेतन्याहू यांनी सलग पाचव्यांदा यश मिळवले होते. परंतु सैन्याच्या एका विधेयकावरून त्यांना मित्रपक्ष गोळा करता नाही आले. त्यामुळे इस्राएलचे सरकार कोसळले. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी पुन्हा निवडणुका होती अशी घोषणा करण्यात आली.
नेत्यन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपही झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु नेतन्याहू यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे विरोधकांचे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते.



























































