
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केली. कर्नाटकमधील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे.
– 1 एप्रिलला वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना मतदान करता येईल.
– ज्या मतदारांचे वय 80 पेक्षा अधिक आहे ते या निवडणुकीत घरातून मतदान करू शकतील.
भाजपचा दारुण पराभव होणार, ओपिनियन पोलचा अंदाज
एबीपी न्यूज आणि सी वोटर तसेच लोकपोलच्या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव होईल. तर काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.




























































