शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यास 15 दिवसांची मुदत

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. त्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली होती, परंतु आयोगाने केवळ 15 दिवसांचीच मुदत दिली आहे. 23 ऑगस्टपर्यंत शिवसेनेला आपले म्हणणे  आयोगासमोर मांडायचे आहे.

बंडखोर एकनाथ शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला असून  निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक चिन्ह हे घटनेतील तरतुदींनुसार मूळ पक्षाकडेच राहते असे तज्ञांचे मत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर 22 ऑगस्टला सर्वेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.