निवडणूक आयोगाचा दे धक्का; भाजपच्या प्रचार गीतावर बंदी

निवडणूक प्रचार रंगात आलेला असताना निवडणूक आयोगाने भाजपला मोठा दणका दिला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने भाजपचे प्रचार गीत  नाकारले आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.

भाजपने महापालिका प्रचारासाठी तयार केलेल्या गीतामध्ये भगवा शब्दाचा वापर केला होता. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार निवडणूक प्रचारात धार्मिक भावना आणि विशिष्ट रंगाचा वापर करण्यास बंदी आहे आणि भाजपने निवडणूक गीतात भगवा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे नमूद करीत हे गीत निवडणूक आयोगाने नाकारले आहे. आता निवडणूक प्रचार टिपेला पोहोचलेला असताना निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार गीतावर बंदी घातल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.

भगवा शब्दावर नोंदवला आक्षेप

भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गीत तयार केले आहे. अवधुत गुप्ते आणि वैशाली सामंत या प्रख्यात गायकांनी ते गायले आहे. मात्र या गीतात वापरलेल्या भगवा या शब्दाला आक्षेप घेत निवडणूक आयोगाने हे गीत नाकारले आहे.