आता हे स्पष्ट झाले की…; अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या एका एक्सवरील पोस्टमुळे बुधवारी एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यावेळी पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती, हिंसाचार, धमक्या, प्रलोभने आणि धाडींपासून मुक्त असतील. ही पोस्ट करताना निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसला निवडणूक आयोगाचा स्पष्ट संदेश या निवेदनासह ही पोस्ट कली. त्यामुळे वाद उफाळून आला असून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे.

टीएमसीच्या या पोस्टवर तृणमूल काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाने टीएमसीसाठी हा शब्द वापरला आहे. एका निष्पक्ष घटनात्मक संस्थेकडून अशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा आहे का? असा परखड सवाल तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, हे उघड आहे की निवडणूक आयोग भाजपकडून थेट सूचना घेत आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. ही गोष्ट आता उघड झाली असून अत्यंत दुर्दैवी आहे. किमान अशा भाषेत ट्विट करून एवढ्या महत्त्वाच्या संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाला नैतिकदृष्ट्या भ्रष्ट संस्था म्हटले आहे. निवडणूक आयोग रहित करा, सर्व सुरळीत होईल, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

West Bengal – यंदाची निवडणूक भय – हिंसा रहित म्हणणाऱ्या आयोगाला संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली