
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर देणे अभिप्रेत आहे. त्यास भारतीय जनता पक्षच उत्तर देऊ लागला आहे. भाजपवर त्यातला कोणताही आरोप नाही. तो निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतले आहेत. मात्र निवडणूक आयोगाचे प्रवत्ते हे भाजपचे नेते व्हायला लागले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, भाजपचे बोलणे हे योगायोग आहे की ते स्वतःहून करतात, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होईल. शेवटी निवडणूक आयोगाने उत्तर देणे जिथे अभिप्रेत आहे त्यावर इतरांनी दिलेल्या उत्तराचे समर्थन करणे शक्य नाही असे जयंत पाटील म्हणाले.






























































