
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक आयोगाने थांबवले आहे. उद्या 11 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना आयोगाने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटासोबतच एनटीआर लक्ष्मी आणि उद्यमा सिंम्हम या दोन चित्रपटांचे प्रदर्शन देखील रोखण्यात आले आहे.
Election Commission on complaints against movies NTR Laxmi, PM Narendra Modi & Udyama Simham: “These have potential to affect level playing field which is in consonance with Model Code of Conduct” & “shouldn’t be displayed in electronic media including cinematograph during MCC” pic.twitter.com/3jRiVDyeE2
— ANI (@ANI) April 10, 2019
या चित्रपटामुळे आचारसंहितेला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेआचारसंहिता लागू असे पर्यंत हा चित्रपट कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर दाखवू नये, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट निवडणूकांनंतरच प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चित्रपटाला मंगळवारी सेन्सॉर बोर्डाकडून ना हरकर प्रमाणपत्रही मिळालेले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने विरोध दर्शवला होता. मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयानेही चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला होता. या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे हा चित्रपट आचार संहितेचा भंग करतो की नाही तसेच प्रदर्शनावर निर्णय निवडणूक आयोगाने घेणं योग्य ठरेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

























































