‘त्या’ पेड न्यूजचा खर्च अशोक चव्हाणांच्या नावावर, निवडणूक यंत्रणेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

लोकसभा निवडणुकीत स्थापन करण्यात आलेल्या पेड न्यूज प्रतिबंधक सनियंत्रण समितीने अशोक चव्हाण आणि डॉ.महेश तळेगावकर या दोन अपक्ष उमेदवारांवर धडक कारवाई केली असून, पेड न्यूज प्रकरणात या दोन्ही उमेदवारांच्या नावावर पेड न्यूजचा खर्च टाकण्यात आला आहे.

पुढारी दैनिकामध्ये अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्यापुढे लोहा असा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे त्या उमेदवाराचे प्रमाणिकरण झाल्याचा निष्कर्ष सनियंत्रण समितीने काढला आणि त्यानुसार अशोक चव्हाण यांना नोटीस पाठविण्यात आली. उत्तरादाखल अशोक चव्हाण यांनी ही पेड न्यूज नसल्याचे सांगितले. तथापी सनियंत्रण समितीने हा खर्च त्यांच्या नावावर 5840 रुपये टाकण्यास आपली संमती असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.

दुसरे अपक्ष उमेदवार डॉ.महेश तळेगावकर यांच्याविषयी श्रमिक एकजूट आणि नांदेड एकजूट या दोन दैनिकांमध्ये सारखाच मजकूर असलेल्या बातम्या प्रसिध्द झाल्या. यावरुन ही पेड न्यूज असल्याचा निष्कर्ष सनियंत्रण समितीने काढला. डॉ.तळेगावकर यांनाही सनियंत्रण समितीने नोटीस पाठविली. त्यांनीही प्रथम हे पेडन्यूज नसल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या खात्यावर17,500 रुपये टाकण्यास त्यांनी संमती दिली.