
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) रविवार दुपारी 3 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करणार आहे, अशी अपेक्षा आहे. या घोषणेकडे राजकीय पक्ष, माध्यमे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेचा उद्देश स्पष्टपणे जाहीर केलेला नसला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये आगामी निवडणुका, मतदार यादी अद्ययावत करणे, तसेच संदिग्ध निवडणूक निकालांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः, SIR प्रणालीबाबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोग यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करू शकतो.
दरम्यान, अलिकडेच काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. निवडणूक आयोग या आरोपांना कसे सामोरे जाणार आणि एसआयआरबाबत कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.