
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रभाग क्रमांक 202 मधील शारदा बाणे आणि श्रीकांत जाधव यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
लातूरकरांच्या अस्मितेला फडणवीस शरण!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लातूरकरांच्या अस्मितेला शरण जाण्याची वेळ आली! आमचा लढा काँग्रेससोबत असला तरी विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. काँग्रेसचे निष्ठावंत असलेले शिवराज पाटील–चाकूरकर यांचे स्मारक सरकारी खर्चातून उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.





























































