
इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग सुरू असतानाच अचानक स्फोट होऊन त्यात मायलेकी गंभीर जखमी झाल्याची घटना आज मुंब्य्रातील अलमास कॉलनी येथे घडली. नुसरत सय्यद या मातेसह तिच्या मुली अफजा व हफजा यांना दुखापत झाली असून मुंबईतील वाडिया रुग्णालयात दाखल केले आहे. इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्पह्ट एवढा भीषण होता की, आग लागून घरातील वॉशिंग मशीन, कपडे, इलेक्ट्रिक वायर जळून खाक झाले.
अलमास कॉलनी येथील सुप्रीम टॉवर या इमारतीच्या तळमजल्यावर रुम क्रमांक 5 येथे ही दुर्घटना घडली. इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग सुरू असतानाच अचानक मोठा स्पह्ट झाला. त्यात मायलेकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त होरपळल्या. त्यांच्या चेहऱ्याला व हाताला मोठी दुखापत झाली. या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.