वाढीव वीज बिलांच्या तक्रारी सुटणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात वाढीव वीज बिलांच्या तक्रारींमुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांसाठी शिवसेनेतर्फे परळगाव येथे मंगळवार, 8 सप्टेंबरला ‘बेस्ट आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमातून वाढीव वीज बिलांच्या तक्रारी सोडवल्या जाणार आहेत.

कोरोनाच्या काळात मुंबईतील अनेक भागांतील रहिवाशांना बेस्टकडून वाढीव वीज बिले पाठवली गेली. त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात परळगावमधील रहिवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार आणि माजी बेस्ट अध्यक्ष, नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या संकल्पनेनुसार परळगाव येथे शिवसेना शाखा क्रमांक 204 मध्ये सकाळी 10 वाजता ‘बेस्ट आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमात बेस्टच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वीज बिलांबाबत तक्रारी असतील त्यांनी येताना वीज मीटरचे सध्याचे रीडिंग किंवा मीटर रीडिंगचे फोटो, जुनी वीज बिलाची प्रत, मोबाईलवरील वीज बील प्रत किंवा मेसेज घेऊन यावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.