
नगरमध्ये येवला नाका चौकातून काळुबाई रस्त्यावर जाताना आढाव वस्तीवर रस्त्यात 132 केव्ही वरून जाणार्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस लाईनवरील जम्पर जळाल्याने याठिकाणी मोठा आगडोंब उसळला. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण पसरले होते. याची दखल घेत महावितरण विभागाने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जंम्पर बदलून विद्युत वाहिनी पूर्ववत केल्याने मोठा अनर्थ टळला. जंम्पर जळाल्यामुळे कोळपेवाडी, कुंभारी परिसरातील गावातील विद्युतवाहक दोन तास खंडित होता.
शनिवारी रात्री नऊ वाजता काळूबाई मंदिर परिसर येथील आढाव वस्ती या लोकवस्ती मधून जाणार्या 33 केव्ही लाईन जंम्पर जळाल्याने अचानक मोठ्या प्रमाणात जाळीचे लोट त्याठिकाणी पडले. तेथील स्थानिक नागरिकांनी अधिकार्यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.
रात्री साडेनऊ वाजता वीज वितरण कंपनीचे कोपरगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता एस.डी. वाणी आपल्या दहा-अकरा वायरमन तीन सह घटनास्थळी दाखल झाले परंतु आढाव वस्तीवरील राहणाऱ्या शंभर कुटुंबातील नागरिकांनी आधी ” लाईन शिफ्ट करा मगच काम करा” असा आग्रह धरून त्यांना काम करण्यास अटकाव केला नागरिकाचा पक्ष वाढवला प्रक्षोभ वाढवून प्रकरण चिघळत असताना नगरसेवक जनार्धन कदम नगरसेवक विजय वाजे आमदार आशुतोष काळे यांचे खाजगी सचिव अरुण जोशी यांनी मध्यस्थी करून नागरिकांची समजूत घातली त्यानंतर वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पथकाने वेगाने काम सुरू केले दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास विद्युत प्रवाह पूर्ववत झाला त्यामुळे दोन तास अंधारात असलेली या जलद वाहिनीवरील कोळपेवाडी व कुंभारी परिसरातील गावे उजळून निघाली.


























































