
कोरोना महामारीमुळे ओढावलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महावितरणने हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. वीज बिल न भरणाऱया जवळपास एक लाख वीज ग्राहकांचा महावितरणने चार-पाच वर्षापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला असून त्याच्याकडे चार हजार कोटी रुपये थकीत आहेत. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने वन टाईम सेटलमेंट योजना आणली आहे. त्यानुसार संबंधित ग्राहकाने वीज बिलाची थकीत रक्कम पाच हप्त्यांमध्ये भरण्याची तयारी दाखविल्यास त्याला व्याजामध्ये 50 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही शुल्काशिवाय वीज जोडणी दिली जाणार आहे.
न्यायालयीन प्रकरणात ग्राहकाने विना अट माघार घेणे बंधनकारक
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केल्याने एखादा ग्राहक न्यायालयात गेला असेल पण तो आता वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ घेऊ इच्छित असेल तर त्याला त्याने विना अट न्यायालयातून आपली केस मागे घेणे बंधनकारक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.































































