
सध्याच्या धावपळीच्या युगात फिट राहण्यासाठी लोकांमध्ये योगा करण्याची क्रेझ वाढतेय. पण तुम्हाला कुणी सांगितलं की साक्षात गजराजदेखील योगा करतायत तर ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर सध्या योगा करणाऱया हत्तीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
हा मजेशीर व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. खरं तर झाडाचं पानं तोडण्यासाठी हत्तीने दिलेली ही योगासनासारखी पोझ दिली आहे. या पोझला सुशांत नंदा यांनी ‘उर्ध्व हस्तासन’ अशी गंमतीदार कॅप्शन दिली आहे. लोकांचीही या मजेशीर व्हिडीओला पसंती मिळतेय. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक व्ह्यूज व्हिडीओला मिळाले आहेत.


























































