36 सेकंदात अकरा वर्षीय मुलाचा 20 लाख रुपयांवर डल्ला, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणामध्ये एका 11 वर्षीय मुलाने अवघ्या 36 सेकंदात 20 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ही घटना बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा आणि त्याच्या साथीदारला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरयाणाच्या जिंद जिल्ह्यात पीएनबी बँकेत कॅशियर सत्यवान यांनी 20 लाख रुपयांचे पाच बंडल आल्या टेबलवर ठेवले होते. काही वेळासाठी ते बाजुच्या टेबलवर गेले. संध्याकाळी त्यांनी टेबलवर सर्व पैसे मोजले तेव्हा त्यात 20 लाख रुपये कमी होते. त्यांनी पुन्हा पुन्हा पैसे मोजले तरी 20 लाख रुपये कमीच होते.

नंतर कॅशियर सत्यवान आणि कर्मचार्‍यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा एक अकरा वर्षाचा मुलगा बँकेत उपस्थित होता. त्याने वेळ पाहून 20 लाख रुपयांचे बंडल आपल्या पिशवीत टाकले आणि हळूच निघून गेला. अवघ्या 36 सेकंदात या मुलाने 20 लाख रुपये लंपास केले. त्याच्या सोबत एक तरुण होता त्याने मास्क घातला होता. दोघेही सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले. कॅशियरने लगेच पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केले आहे.