
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी रविवारी संध्याकाळी जाहीर झाली असून सायन्ससह काँमर्स आणि आर्टस् शाखेचा कटऑफ 94 टक्क्यांच्यावर आहे. यंदा मुंबईतील सर्वच नामांकित कॉलेजचा कॉमर्स शाखेचा कटऑफ हा 90 टक्क्यांवर आहे. पहिल्या यादीत तब्बल 1 लाख 17 हजार 520 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून यातील 40 हजार 476 विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले आहे.
विविध बोर्डाच्या 2 लाख 12 हजार 152 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले होते यांपैकी 94 हजार 632 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज अलॉट झालेले नाही. मुंबई विभागात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि एचएसव्हीसी शाखेच्या एकूण 2 लाख 20 जागा आहेत. पहिल्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.
शाखानिहाय मिळालेले प्रवेश
शाखा एकूण जागा प्रवेश मिळाले
सायन्स 66,791 37,976
कॉमर्स 1,05,160 66,140
आर्टस् 24,176 12,502
एचएसव्हीसी 3893 902
पहिल्या चार पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी
पहिली पसंती 40,476
दुसरी पसंती 18,281
तिसरी पसंती 13,347
चौथी पसंती 11,247
मुंबईतील काही कॉलेजच्या कटऑफ
कॉलेज आर्टस् कॉमर्स सायन्स
एचआर – 93.8
केसी 90.2 92.2 89.4
रुईया 94.2 – 94.8
पोदार – 94.2 –
रूपारेल 91.2 92 93.4
साठय़े 85.8 91 92.8
डहाणूकर – 92.4 –
भवन्स 84.4 90.6 90.2
मिठीबाई 89.4 91.8 89.8
एन एम – 94 –
वझे केळकर 91.6 93.6 94.4
मुलुंड काँलेज – 93.3 –
सीएचएम 70.8 85.6 91.2
फादर अँगनेल – 88.6 94.6
झेवियर्स 94.6 – 91.4

























































