
सुंदर दिसण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, त्याचा नेम नाही. अगदी वाट्टेल ते करून सुंदर दिसायचं या अट्टाहासामुळे कधी कधी भलताच त्रास होऊ लागतो. असाच काहीचा प्रकार एका अभिनेत्री-मुष्टियोद्धा महिलेसोबत घडला आहे.
या महिलेचं नाव एले ब्रुक असं आहे. एलेने तिच्या एका प्लास्टिक सर्जरीविषयी नुकताच खुलासा केला आहे. एले म्हणाली की, अभिनय आणि बॉक्सिंग या करिअरनंतर मी ऑनलाईन पद्धतीने न्यूड फोटो पोस्ट करून पैसे कमवण्याच्या एका पर्यायाचा विचार करत होते. त्यामुळे मी स्वतःला अजून आकर्षक करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली, असं एले म्हणाली.
पण, तिची ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. तिने आपल्या नितंबांचा आकार बदलण्यासाठी ब्राझिलियन बट सर्जरी नावाची शस्त्रक्रिया करवली. पण ती शस्त्रक्रिया तितकी चांगली झाली नाही. या शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरीरावर काळेनिळ्या खुणा उमटल्या होत्या. तिला बसायलाही खूप त्रास होत होता. तिच्या म्हणण्यानुसार एखाद्या अवजड वाहनाने धडक द्यावी तशी तिची अवस्था झाली होती.
या शस्त्रक्रियेसाठी तिने आठ लाख रुपये मोजले होते आणि नेमकी ही शस्त्रक्रिया करून योग्य तो परिणाम साधला गेला नाही. यापूर्वीही एलेने गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली होती. ती शस्त्रक्रिया कमालीची यशस्वी झाली होती, असं एलेचं म्हणणं आहे.
























































