पाकिस्तानात आणीबाणी, डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून पंजाब प्रांतातील रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. पंजाबच्या सर्व जिह्यांमध्ये हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे. नागरी संरक्षणासह सर्व संबंधित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे. आज सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.