देवगडच्या मळई खाडीपात्रात आपत्कालीन रंगीत तालीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील मळई खाडीपात्रात दोन खलाशी बुडाले असा फोन स्थानिक जामसंडे पोलीस पाटील यांनी देवगड पोलीस स्थानकात दुपारी चारच्या सुमारास केला. त्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या नेतृत्वाखाली देवगड पोलिसांचे पथक सागरसुरक्षा आपत्तत्कालीन पथक ,लाईफ जॅकेट ,रिंग बोई, छोट्या नौकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी अजय मयेकर व अभिषेक कोयंडे हे बुडत असताना दिसले. तात्काळ बचाव साहित्यसह पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील प्रवीण त्रिबके सह सागर सुरक्षा रक्षक हरेश्वर खवळे, धाकोजी खवळे यांनी समुद्रात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन्ही युवकांना वाचविले. हा सर्व प्रकार पाहण्याकरिता बघ्यानी गर्दी केली होतीं. अखेर त्या युवकांचे प्राण वाचल्याबद्दल नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला .परंतु ती आपत्कालीन रंगीत तालीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन व सागर सुरक्षा रक्षक यांच्या सह राबविण्यात आली होती.असे समजले.

या आपत्कालीन रंगीत तालीम मोहिमेत पोलीस हवालदार

फक्रुद्दीन आगा, विठ्ठल जोशी,महिला पोलीस नाईक विनिता भुजे,अन्वीता कदम,प्राजक्ता कवीटकर कॉन्स्टेबल गणेश चव्हाण,प्रशांत गावडे,सागर सुरक्षा रक्षक,सुजय जोशी,योगेश फाटक,संतोष ठुकरुल,अल्पेश नेसवणकर,अमित बांदकर जितेंद्र झाजम,यांनी सहभाग घेतला होता.