
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. भारतीय शिल्पकलेला आधुनिक ओळख देणाऱ्या राम सुतार यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची स्मारके व पुतळे साकारले. त्यांच्या कलाकृतींमधून वास्तवदर्शी शैली, सूक्ष्म तपशील आणि भव्यतेचा संगम दिसून येतो. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना देश-विदेशात मान्यता मिळाली होती.
राम सुतार यांच्या निधनाने हिंदुस्थानी कला विश्वावर शोककळा पसरली आहे. शिल्पकलेतील त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहणार असून, पुढील पिढ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरतील. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना कलाकार व कला रसिकांनी व्यक्त केली आहे.
राम सुतार यांनी जगातले सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार पटेल यांचा पुतळा साकारला आहे. तसेच विदेशात अनेक ठिकाणी असलेल्या महात्मा गांधींचे पुतळे राम सुतार यांनीच साकारले होते.
1999 साली त्यांना पद्मश्री तर 2016 साली पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मार्चमध्ये त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.






























































