जम्मू कश्मीरमध्ये चकमक, चार दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या अनंतनागरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

अनंतनागमध्ये वटरीगामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली. तेव्हा सुरक्षादलाने या भागात शोधमोहीम राबवली. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. तेव्हा उत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. त्यात चार दहशतवादी ठार झाले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. या चकमकीत कुठलाही जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही.

11मार्च रोजी कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले होते.