
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सैन्यदलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असून आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शोपियानमधील गहंड परिसरात शनिवारी पहाटे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला असून लसर्च ऑपरेशन सुरू आहे.
Jammu and Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Shopian district. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xioVUQFXLH
— ANI (@ANI) April 13, 2019
शोपियानमधील गहंड परिसरात दहशतवादी लपले असण्याची माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
























































