इंग्लडचा वेगवान गोलंदाज Mark Wood ने आपल्या वेगवान गोलंदाजीने सुरुवातीपासूनच सर्वांना प्रभावित केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात मार्क वुडने 156.3 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे शोएब अख्तर आणि मिचेल स्टार्कचा विक्रमाला एक प्रकारे मार्क वुडने आव्हान दिले आहे.
इंग्लडचा वेगवान गोलंदाज मार्ग वुड सध्या वेगावर स्वार आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीची सर्वत्र चर्चा आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात मार्क वुडला जेम्स एंडरसनच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. मार्क वुडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात गोलंदाजी करताना 156.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. त्याच्या या वेगवान गोलंदाजीमुळे शोएब अख्तर आणि मिचेल स्टार्क यांचा वगेवान चेंडू फेकण्याचा विक्रम धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रचलित असणाऱ्या पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरच्या नावावार आहे. शोएब अख्तरने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने न्युझीलंडविरुद्ध 160.4 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला होता.