आसनगावजवळ मालगाडीचे इंजिन फेल, ‘मरे’ची वाहतूक उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडलं आहे. कल्याण कसारा मार्गावरील आसनगाव-वाशिंद दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसाऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अप मार्गावरील वाहतूक देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कल्याणकडे येणाऱ्या उपनगरीय गाड्या उशिराने धावत आहेत. तशी उद्घोषणा रेल्वे स्थानकांवरून करण्यात येत आहे.