पुणे – इंजिनिअरकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा विनयभंग

3460

आर्किटेक्ट इंजिनिअरकडे प्रशिक्षार्थी म्हणून असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार एरंडवण्यात घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी आशिष उत्तम चोले (वय – 40, रा. झेड रेसिडेन्सी, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक्षणार्थी तरूणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेत आहे. एरंडवण्यात चोलेच्या एरंडवणे येथील डिझाईन फर्स्ट स्टुडिओच्या कार्यालयात ती कार्यरत होती. त्यावेळी चोलेने तरूणीशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. त्यानंतर संबंधित तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या