इंजिनीयरिंगचे वर्ग 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील इंजिनीयरिंग आणि तंत्रशिक्षण संस्थांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इंजिनीयरिंगच्या नव्या बॅचचे वर्ग 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. एआयसीटीईच्या सुधारित वेळापत्रकाला सर्वेच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. जुन्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू केले जातील असे त्यात म्हटले आहे. कोरोना परिस्थिती आणि विविध शिक्षण मंडळांच्या विशेषत: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांच्या तारखांचा अंदाज घेऊनच हे सुधारित वेळापत्रक बनवण्यात आले आहे.

…असे आहे सुधारित वेळापत्रक

प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या समुपदेशन राऊंडची समाप्ती – 30 सप्टेंबर 2021

दुसऱ्य़ा समुपदेशन राऊंडची समाप्ती – 10 ऑक्टोबर 2021

प्रवेश रद्द करणे आणि शुल्क परत करणे – 15 ऑक्टोबरपूर्वी

नव्या बॅचचे वर्ग सुरू – 25 ऑक्टोबर 2021

जुन्या बॅचेसचे वर्ग सुरू – 1 ऑक्टोबर 2021