
इंग्लंड व टीम इंडियामधील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानात खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकलेल्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात चार महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यात तीन गोलंदाज व एका फलंदाजाचा समावेश आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने जेम्स अँडरसन, डॉमिनिक बेस, जोफ्रा आर्चर हे गोलंदाज व जोस बटलर या फंलदाजाला विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी स्टुएर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, मोईन अली व ऑली स्टोन यांना संधी देण्यात आली आहे. जेम्स अँडरसन अहमदाहबाद येथे गुलाबी बॉलने खेळवल्या जाणाऱ्या कसोटीसाठी फिट असावा यासाठी त्याला या सामन्यात विश्रांती दिल्याचे समजते.
इंग्लंडचा अंतिम 12 चा संघ –
जो रुट (कर्णधार), रोरी बर्न्स, डोम सिबले, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लिच, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रेस वोक्स, बेन फोक्स, ओली स्टोन
दुसरी कसोटी प्रेक्षकांच्या साक्षीने
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये चेन्नई येथे झालेली पहिली कसोटी प्रेक्षकांविना पार पडली. या कसोटीतील पराभवाला मागे सारून टीम इंडियाचा संघ 13 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरू होणाऱया दुसऱया कसोटीसाठी सज्ज झालाय. विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी त्याआधी एक आनंदाची बातमी आहे. दुसऱया कसोटीत यजमान संघाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार आहे. स्टेडियममध्ये 50 टक्के क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कसोटीसाठी स्टेडियमनजीक कडक नियमांचा अवलंब करण्यात येणार आहे.




























































