गांधीजींच्या चष्म्याचा लिलाव

492

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्म्यांचा ब्रिटनमध्ये लिलाक होणार आहे. गांधीजींनी इंग्लडमध्ये असताना आपल्या एका सहकाऱ्याला हे चष्मे भेट दिले होते. शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व आले आहे. या चष्म्यांची किंमत 10,000 ते 15,000 पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 9 ते 14 लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.

ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स या कंपनीच्या स्टाफला एका लिफाफ्यात लेटरबॉक्समध्ये ठेवलेले गांधीजींचे हे चष्मे सोमवारी आढळून आले. माझ्या एका कर्मचाऱ्याने ते माझ्याकडे आणून दिले आणि त्याने मला सांगितलं की, या चष्म्यांसोबत एक चिठ्ठी असून त्यामध्ये हे महात्मा गांधींचे चष्मे असल्याचे म्हटले आहे, असे या कंपनीचे संचालक स्टोव्ज यांनी सांगितले. स्टोव्ज यांनी नीट न्याहाळले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण चष्म्यांच्या काड्या या सोन्याच्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या