धक्कादायक! नऊ महिन्याच्या मांजरीवर बलात्कार  

3816

एका नऊ महिन्याच्या मांजरीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंग्लंडमधील वॉकिंग नावाच्या शहरात ही घटना घडली आहे. ही मांजर एका व्यक्तीला रस्त्यात अर्धमेलेल्या अवस्थेत सापडली. त्या व्यक्तीने या मांजरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी या मांजरीची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इंग्लंडमधील वृत्तपत्र ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या मांजरीवर बलात्कार केल्यानंतर मांजरीला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. या मांजरीच्या शरीरावर काही जखमा देखील आहेत. मात्र आता ही मांजर सुखरूप असून तिला सिमन ममफॉर्ड यांनी दत्तक घेतले आहे. सिमन यांनी या मांजरीचे नाव मिनी असे ठेवले आहे.

दरम्यान, मिनीवर झालेल्या बलात्काराची गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञान इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या इसमाचा शोध घेत आहे. इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या अपराधासाठी कडक शिक्षेची तरतूद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या