
इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांमध्ये सध्या तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यतात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने चौफेर फटकेबाजी करत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकन गोलंदाजांवर हॅरी ब्रूक अक्षरश: तुटून पडला होता. त्याने अवघ्या 114 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले शुभमन गिलाच विक्रम मोडित काढला. या कामगिरीसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. टॉम बॅंथनने 51 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. 85 या धावसंख्येवर इंग्लंडचे दोन फलंदाज तंबुरत परले होते. मात्र, मधल्या फळीत जो रुट (69) आणि हॅरी ब्रुक यांनी डाव सावरला आणि संघाला 400 पार नेलं. ब्रूकने 116 चेंडूंमध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 202 धावांची स्फोटक खेळी केली. तर व्हिल जॅक्सनेही आपले हात धुवून घेत 30 चेंडूंमध्ये नाबाद 66 धावा चोपून काढल्या. इंग्लंडने निर्धारीत षटकात श्रीलंकेला 430 धावांचे आव्हान दिले आहे.
दरम्यान, ब्रूकने 114 चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण करत यापूर्वीचा शुबमन गिलचा विक्रम मोडला. शुभमन गिलने गेल्या महिन्यात गुवाहाटी येथे वेस्ट इंडीजविरुद्ध 117 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले होते. या विक्रमी यादीत ईशान किशन (126 चेंडू) तिसऱ्या, ग्लेन मॅक्सवेल (128 चेंडू) चौथ्या, पाथुम निसंका (136 चेंडू) पाचव्या आणि ख्रिस गेल (138 चेंडू) सहाव्या स्थानावर आहेत. ब्रूकच्या या तडाखेबंद आणि विक्रमी खेळीमुळे क्रिकेट जगतात त्याच्या फलंदाजीची जोरदार चर्चा होत आहे.




























































