गेम ऑन, अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच बेल बॉटचा ट्रेलर पूजा एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील शेअर करण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्याच्या काही मिनिटच याच्या ट्रेलरवर लाईक्सचा पाऊस झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 40 हजार लोकांनी याच्या ट्रेलर लाईक केला आहे.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून हिंदुस्थानी विमानाच्या अपहरणाचा थरार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थानात 19 ऑगस्ट 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय पुन्हा आपल्याला या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या