
बॉलीवूडची गायिका नेहा कक्कड कायम चर्चेत असून तिच्या एका नव्या गाण्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर लोकांनी तिला एक आयकॉनिक गाणे खराब केल्याचा आरोप करत ट्रोल करत आहेत. त्यावर नेहाने ट्रोलर्संना चोख उत्तर देत एक पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूड गायिका नेहा कक्कडने आपले नवीन गाणे ‘ओ सजना’ रिलीज केले. हे गाणं फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. या गाण्यावरुन नेहा कक्कडला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पण त्यानंतर नेहाने ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे. ती म्हणाली, ती तिच्या हुशारीने, मेहनतीने आणि पॅशनमुळे आज इथपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळेच ती आज बॉलीवूडची सुपरहिट गायिका आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहे.
नेहा कक्कडने सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे. तिने लिहीलेय की, मी आज जे काही आहे त्या ठिकाणी कमीजणं पोहोचतात आणि तेही कमी वयात. याप्रकारचे फेम, न मोजता येणारी गाणी, सुपरहिट टिव्ही शोज, वर्ल्ड टूर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचे चाहते. अजुन काय हवे. तुम्हाला माहित आहे की हे सगळं मी कसं मिळवलं ? माझी हुशारी, माझं पॅशन, मेहनत आणि सकारात्नकतेच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळे आता माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानू इच्छित आहे. धन्यवाद. मी या जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस आहे, तुम्हाला सर्वांना तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. असे तिने पोस्टमध्ये लिहीले आहे.
View this post on Instagram
नेहा कक्कडने 1999मध्ये फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याला रिक्रिएट केले होते. हे गाणं एकेकाळचे सुपरहिट गाणे आहे. आजही 90 ची लोकं हे गाणं आवडीने ऐकतात. नेहाच्या गाण्यांना ऐकल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात होते. युजर्सनी नेहा कक्कडवर आयकॉनिक गाणे खराब केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नेहा कक्कडवर फाल्गुनीही नाराज झाली होती. त्यावेळी फाल्गुनीने इंस्टाग्रामवर नेहा कक्कडला ट्रोल करण्यात आलेले अनेक मीम्स आणि मेसेज शेअर केले होते.
View this post on Instagram
नेहाने गायलेले गाणे ‘ओ सजना’ मध्ये तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. या गाण्याला नव्या फ्युजनसह रोमॅण्टिक लव्ह स्टोरीमध्ये दाखवण्यात आले आहे. या म्युझिक व्हिडीओच्या स्टार कास्टमध्ये टिव्ही अभिनेता प्रियांक शर्मा, नेहा कक्कड आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा दिसत आहेत.





























































