रणवीरचे न्यूड फोटो पाहून अर्जुन कपूर असं काही बोलला, होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंचे काही कौतुक करत आहेत तर काही त्याला ट्रोलही करत आहेत. अशातच रणवीरचा खास मित्र अभिनेता अर्जुन कपूरला एका कार्यक्रमा दरम्यान रणवीरच्या ट्रोलींगबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अर्जुन रणवीरबाबत असं काही बोलला की हा चर्चेचा विषय बनला.

बॉलीवूडचा मोस्ट एनर्जेटिक आणि कूल अभिनेता अशी ओळख असलेला रणवीर सिंह कायम चर्चेत असतो. रणवीरने नुकत्याच केलेल्या न्यूड फोटोशूटने खळबळ उडवली. त्याच्या फोटोंची सगळीकडे चर्चा झाली. कोणी न्यूड फोटोशूट केल्याच्या धाडसाचे कौतुक केले तर कोणी त्याला ट्रोलही केले आहे. पण आता रणवीरचा खास मित्र अर्जुन कपूरने त्याच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुन कपूर आपल्या आगामी सिनेमा ‘विलेन रिटर्न’ च्या प्रमोशनासाठी गेला असता एका पत्रकाराने रणवीरच्या न्यूड फोटोशूटच्या ट्रोलींगबाबत त्याला प्रश्न विचारला. यावेळी अर्जुन आपल्या मित्राची बाजू घेत म्हणाला, रणवीर सिंह जसा आहे तसाच आहे. तो दिखावा करत नाही. तुम्ही रणवीरला गेली 11-12 वर्षे ओळखता. तो जे पण करतो तो त्याच्या व्यक्तीमत्वाचा भाग आहे. तो जे काही करतो त्यात त्याची इच्छा आहे, त्याचा सोशल मीडिया आहे. त्याला जसे आवडते तसे तो करतो आणि आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे.

पुढे तो म्हणाला, आपलं मत व्यक्त करणं चुकीचे नाही, मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे. कारण मला वाटतं लोकं काही ना काही बोलणारच ते त्यांचे कामच आहे. मात्र आपल्याला जे वाटतं तेच करायला हवे. जर तो आनंदी आहे तर आपल्यालाही त्याचा आदर करायला हवा आणि जे तो करु इच्छित आहे ते त्याला करु द्यावे.

मासिकासाठी रणवीरने केले फोटोशूट

रणवीर सिंहने हे न्यूड फोटोशूट एका मासिकासाठी केले होते. त्याचे फोटो समोर येताच सोशल मीडीयावर खळबळ माजली होती आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. रणवीरच्या न्यूड फोटो पाहून काहींनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी त्याला ट्रोल करत आहेत.