Photo – टाय-डाय शिबोरी प्रिंट ड्रेसमध्ये सोनम कपूर दिसतेय सुंदर, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने ‘सावरीया’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सोनम तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. सध्या ती मातृत्वाचा अनुभव घेत आहे. पण सोनमने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा टाय-डाय शिबोरी प्रिंट मॅक्सी ड्रेस घातला असून सोनमने आपले काही फोटो शेअर केले आहेत. सोनमने चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला असून चेरी रेड लिपस्टिक लावली आहे. जी तिच्या आऊटफिटला कॉम्पलिमेण्ट करत आहे. सोनमने पायात ब्राऊन बेली हील्स घातले आहेत. तर या ड्रेसवर तिने स्लीक पोनीटेल बांधली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्य़ांच्या कॉमेण्ट्सचा पाऊस पडत आहे.