उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

टोयोटा कार लोकप्रिय करणारे वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले ते 64 वर्षांचे होते. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम किर्लोस्कर हे 1888 साली स्थापन झालेल्या किर्लोस्कर उद्योग समूहातील चौथ्या पिढीचे सदस्य होते. त्यांनी अमेरिकेतील ‘एमआयटी’मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. टोयोटा किर्लोस्करचे ते 1998 पासून उपाध्यक्ष होते. ते किर्लोस्कर सिस्टम्सचे अध्यक्षही होते.