दहशतवादी चंद्रावरून  येत नाहीत! युरोपियन संसदेनेही पाकिस्तानला चोपले

1292

संयुक्त राष्ट्र संघातील वार्षिक महासभेत तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानला आता युरोपियन देशांच्या संसदेनेही (ईयू) चांगलेच सुनावले. ‘हिंदुस्थानच्या कश्मीरमधील दहशतवादी  कारवायांची दखल घेणे गरजेचे आहे. हिंदुस्थानच्या जमिनीवर होणार्‍या दहशतवादी कारवाया कोणी चंद्रावरून येऊन करत नाही तर पाकिस्तानमधून आलेले दहशतवादीच या कारवाया करतात’ असे युरोपियन संसदेने स्पष्ट करत हिंदुस्थानला पाठिंबा दिला.

कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत आदळआपट करायला सुरुवात केली, मात्र  सगळय़ाच पातळय़ांवर पाकिस्तानचे तोंड फुटले आहे. आताही युरोपियन संसदेत कश्मीर मुद्दा घेऊन गेलेल्या पाकिस्तानला अनेक संसद सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.

आपली प्रतिक्रिया द्या