इंग्लंड, क्रोएशियाची शानदार कीक! दोन्ही संघ डी गटातून बाद फेरीत

इंग्लंड व क्रोएशिया या दोन देशांनी युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील डी गटामधून बाद फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत झेक प्रजासत्ताकला 1-0 असे पराभूत करीत साखळी फेरीत दुसऱया विजयाला गवसणी घातली आणि सात गुणांसह गटात अक्वल स्थान पटकावले. क्रोएशियाने स्कॉटलंडवर 3-1 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला व चार गुणांसह या स्पर्धेत पुढे पाऊल टाकले. या गटातून झेक प्रजासत्ताकने चार गुणांची कमाई केलीय. पण त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश सध्या तरी वेटिंगवर आहे. स्कॉटलंडला या गटात फक्त एकच गुण कमवता आलाय. त्यामुळे त्यांचा या स्पर्धेतील खेळ खल्लास झालाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या